
प्रतिनिधी: वृषभ पोफळी,वर्धा
वर्धा शहरातील प्रत्येक हालचालींवर नियंत्रण राहावे , यासाठी पोलीस अधीक्षक कर्यालयात कंट्रोल युनिट तयार करुन शहरातील हालचालींवर ४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून नजर ठेवली जात होती . मात्र , २५ मार्च रोजी कंट्रोल युनिटला आग लागल्याने संपूर्ण यंत्रणेचे काम खोळंबले . मात्र , तेव्हापासून तर आजर्यंत म्हणजेच तब्ब्ल दहा महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डोळे मिटलेलेच आहे . परिणामी , वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरुन बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारावा लागतो आहे . शहरात वाढत्या चोऱ्या , वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा नियोजन सिमतीकडून अंदाजे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता . त्यातून शहरातील आर्वीनाका चौक , शास्त्री चौक , वंजारी चौक , पावडे चौक , निर्मल बेकरी चौक , शिवाजी चौक आदी विविध चौकांत सुमारे ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले . याचे काम पुणे येथील समर्थ सिस्टीम एजन्सीला काम सोपविण्यात आले . शहरातील हालचालिंवर कॅमेयातून नजर ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात कंट्रोल युनिट तयार करण्यात आले . या युनिटमधून नजर ठेवण्यात येत होती . अनेक दुचाकीचालकांवर कारवाया करण्यात आल्या . मात्र , २५ मार्च रोजी कंट्रोल युनिटला आग लागून संपूर्ण युनिटजळून खाक झाले . तेव्हापासून आजपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे . कंट्रोल युनिट पुन्हा सुरु करण्यासाठी ४० लाख रुपये खर्च लागणार असून तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता मात्र , अजूनही सीसीटीव्हीचे डोळे मिटलेलेच असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे . त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्यात यावे , अशी मागणी होत आहे .
