
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
वडकी येथील सुप्रसिद्ध डॉ पंकज टापरे यांचा मुलगा, सेंट जॉन्स स्कूल हिंगणघाट चा विद्यार्थी मयंक पंकज टापरे हा नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय प्रवेश पात्रता या परीक्षेत यशस्वी झाला असून त्याची नवोदय साठी निवड झाली आहे.
विशेष म्हणजे ऑल इंडिया सैनिक स्कूल च्या परीक्षेतही अव्वल येऊन व उत्कृष्ट मार्क्स मिळवून इयत्ता सहावीत सैनिक शाळेत प्रवेश मिळविला आहे.
तो सैनिक शाळेत प्रवेश मिळविलेला यवतमाळ-वर्धा जिल्ह्यातील या वर्षीचा एकमेव विद्यार्थी आहे.
तसेच नुकत्याच लागलेल्या नवोदय च्या निकालात सुद्धा तो प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. या त्याच्या दुहेरी यशामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मयंकने आपल्या यशाचे श्रेय त्याचे वडील डॉ. पंकज टापरे , आई डॉ. राजश्री टापरे, त्याचे शाळेतील शिक्षक व सुपर सिक्स अकॅडमी हिंगणघाट चे श्री. विनोद जांभूळे सर याना दिले आहे.
त्याचे प्रफुल्ल काकडे, प्रा अभिजित डाखोरे, राजेंद्र झोटिंग, सागर इंगोले, सेंट्रल बँकचे व्यवस्थापक चंद्रशेखर कारेकर,मंगेश कचवे, बाळासाहेब जवादे, प्राचार्य मंजूषा सागर, दिलीप बांगरे, गोपाल सांगानी, चंद्रकांत भोयर,मोसीन पठाण,प्रकाश चिव्हाने, गणेश गोळकर, यांनी अभिनंदन केले आहे.
