
:-उद्योजिकतेतून आर्थिक उन्नती साधा – आमदार दादाराव केचे यांचे प्रतिपादन.
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/ पियुष रेवतकर
कारंजा (घा):-महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय वर्धा द्वारा संचालित आशाकिरण लोकसंचलित साधन केंद्र कारंजा घाडगे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आज भोयर पवार सभागृह कारंजा येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेचे उद्घाटक म्हणून आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादाराव केचे हे होते ,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चंदाताई मोहळे या उपस्थित होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजू इंगळे विभागीय साधनव्यक्ती माविम नागपूर विभाग ,तसेच संगीता भोंगाडे जिल्हा समन्वय अधिकारी माविम वर्धा या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कारंजा तहसीलच्या तहसीलदार ऐश्वर्या गिरी, कारंजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी डी राजपूत, पशूधन विकास अधिकारी दीक्षा पाटील, विभागीय अधिकारी आयसीआयसीआय बँकेचे प्रभाकर मिश्रा ,कारंजा शाखा व्यवस्थापक एस बी आयचे धीरज पराते, शाखा व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया कारंजा चे तुषार वाघमारे, त्याचप्रमाणे शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्रचे विशाल सोनटक्के ,त्याचप्रमाणे शाखा व्यवस्थापक माविम तालुका व्यवस्थापक कारंजा अमोल राऊत व जिल्हा उद्योग केंद्राचे रोशन तायवाडे हे उपस्थित होते. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व पाहुण्यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल राऊत यांनी केले तर यावेळी कारंजा तहसीलच्या तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना म्हटले की महिलांची स्वतःची आर्थिक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. संस्थात्मक कर्ज घेण्यासाठी प्रयत्नशील रहा व कागदपत्रांची पूर्तता करा.सर्व बँकानी महिलांना सहकार्य करावे व सर्वांशी सर्वांनी मिळून महिलांच्या उन्नतीसाठी सहकार्य करावे. तालुकास्तराहून जी काही मदत लागेल ते आम्ही करू, उद्योजकीकता हा शब्द प्रचलित व्हावा हा यामागचा उद्देश आहे असे यावेळी तहसीलदार यांनी आपले मत मांडले.
तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादाराव केचे यांनी महिलांना संबोधित करताना म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हाल-अपेष्टा सहन केली व स्वतः शिकून दुर्बल घटकांना पुढे आणण्याचं काम केलं त्यासाठीच आपण सुद्धा सर्व महिलांनी शिकून उधोजक बनवून उद्योग स्थापन करून स्वतःचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कर्ज घेणे व घरी खर्च करणे हे यातून साध्य होत नाही तर कर्ज घेऊन कुकुट पालन सारखे उद्योग घरच्या घरी राहून कुटुंबासोबत तयार करून स्वतःचा आर्थिक उन्नती केली तरच आपलं व कुटुंबाच्या कल्याण होईल असे मत यावेळी आमदार दादाराव केचे यांनी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आशाकिरण लोकसंचालित साधन केंद्र कारंजा यांच्यातर्फे करण्यात आलं होतं. माविमच्या 371 स्वयंसहाय्यता गटांच्या एकूण 4 हजार महिलांपैकी पाचशे महिलांची उपस्थिती होती. यावेळी आशाकिरण लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा चंदाताई मोहळे, अमोल राऊत व्यवस्थापक व सर्व कार्यकारणी व गाव प्रतिनिधी, लेखापाल ,उपजीविका समन्वयक ,सहयोगीनी व सर्व सीआरपी त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजया वाघ यांनी मानले.
