
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे
कोरोणा संसर्ग हा जानेवारी २०२० पासून सूरू आहे . उपजिल्हारुग्णलयात कोवीड उपचार करण्याकरिता व्यवस्था करण्यास्तव इतर रुग्णांची OPD बंद करण्यात आली यामुळे इतर आजारांवर औषधो उपचारा करिता सामान्य रुग्णांना मज्जाव करण्यात आला.कोरोणाची पहिली लाट ओसरल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने आणि राज्य शासनाने कोरोणाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात सतर्क राहण्याचे वारवांर आवाहन केल्यानंतरही आमदार महोदयांनी आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेऊन रूग्णालयांमध्ये अगोदरच पूरेशा बेड , आॕक्सीजनची , औषधांची व्यवस्था आरोग्य विभागाच्या माध्यमाने का करून घेतली नाही ?
स्थानिक नगरीपरषदेत सत्ता सुध्दा आमदार महोदयांच्याच पक्षाची असतांना नगरपरीषदेच्या माध्यमातून कितीदा शहराचे स्यॅनीटायजेशन करून घेतले ? लॉकडाऊन नियंत्रण करण्याकरिता नगरपालिका दंड वसूल करण्याचे जेवढे प्रयत्न केले त्या प्रमाणात रूग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्या करिता काय नियोजन केले शहरातिल नागरीकांच्या आरोग्याची जबाबदारी नगरपालिका ने कीती व कश्या प्रकारे पार पाडली ? आरोग्य यंत्रणा हाताळण्यात आणि कोरोणा संसर्ग नियंत्रित करण्याच्या व्यवस्थापणात आमदार महोदय अपयशी ठरले नाही का?
आमदार महोदय ज्या भागाचे प्रतिनीधीत्व करतात त्या हिंगणघाट-समुद्रपूर तालूक्यात कोरोणाचा उद्रेक पहायला मिळतो आहे.
शहरी भागामध्ये असलेला हा कोरोणा आता गावखेड्यातील गल्ली गल्लीत पोहचला आहे.गावखेड्यात कोरोणामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.तरुणांचे होणारे मृत्युं समाज आणि यंत्रणा यांचीही झोप उडवून गेले आहे . मग आरोग्य सुविधे अभावी होत असलेल्या या वाढत्या मृत्युंना जबाबदार कोण ?
गावखेड्यात कोरोणाची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना आमदार महोदयांनी प्रशासनासोबत किती बैठका घेतल्या ?
टेस्टींग, ट्रेसींग आणि ट्रिटमेंट या त्री सूत्रीचे योग्य रीतीने पालन करण्याचे काय नियोजन केले . गावखेड्यातील वाढता कोरोणा नियंत्रित करण्यासाठी गावखेड्यातील वेगवेगळ्या भागात कोरोणा रुग्णांची आतापर्यंत किती शिबीरे आयोजित केली.? कोरोणाग्रस्तांना मार्गदर्शन करण्यासाठी वा त्यांना मदत करण्यासाठी किती मार्गदर्शक केंद्रे आणि मदत केंद्र उभारली? ग्रामीण भागात किती आरोग्यविषयक सुवीधा पुरविल्यात ?
कार्यसम्राट आमदार महोदयांनी आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पैशानी किती आॕक्सीजन सीलेंडर,व्हेंटिलेटर,अॕक्सीमेटर,रेमडीसीवर इंजेक्शन कोव्हीड रूग्णालयाला घेऊन दिले.याचीही माहिती जनतेला कळली पाहिजे .
कोरोणा रूग्णांना आॕक्सीजन सीलेंडरची व्यवस्था करून देणारे शहरातील सर्व उद्योजक गौरवास आणि अभिनंदनास पात्र आहेतच. पण आॕक्सीजन सीलेंडर जर उद्योजकांनी दिले तर आॕक्सीजन सीलेंडर सोबत आमदार महोदयाचे फोटो वर्तमानपत्रात कसे काय झळकले? हा प्रसिद्धीचा हपापलेपणा नव्हे तर काय?
कोरोणाबाधीत रूग्णांव्यतीरीक्त इतरही आजारांचे रूग्ण मोठ्या प्रमाणात असते याची माहिती आमदार महोदयांना आहे की नाही ?.उपजिल्हा रूग्णालयात जेव्हापासून कोरोणा रूग्णांवर उपचार सुरू झाले तेव्हापासून इतर आजारांविषयीची ओपीडी बंद आहे. याची माहीती आंपणास आहे काय ?
इतर रुग्णांकरिता वैकल्पिक व्यवस्था का सुचली नाही ओ.पी.डी. बंद चा निर्णय प्रशासनाने घेतला तेव्हा आपण विरोध का केला नाही ? ओ.पी.डी. बंद करण्यास संमती दिली काय ? संमती देतांना इतर आजारांवर उपचार केले जात नाही.त्यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या सर्वसामान्य अशा गरीब रूग्णांचे ,गरोदर महिलांचे हाल होत आहेत.उपचाराअभावी अनेक रूग्ण मृत्यूमूखी पडत आहेत.अशा रूग्णांवर उपचार करण्यासाठी कार्यसम्राट अशा आमदार महोदयांनी कोणती व्यवस्था उभारली ?
असे अनेक आणि अनेक प्रश्न आहेत.त्याची समर्पक
अशी उत्तरे आमदार देतील ही अपेक्षा आहे. सावंगी झाडे या गावातील 2 महिला घरातच मृत्ताअवस्थेत असने प्रशासनास 3 दिवसानंतर समजणे आणी वासी कोरा येथील गरोदर महिलेचा बाळासह उपचारा अभावी ओढवलेला मृत्यु हे वैद्यकिय यंत्रणा व प्रशासनाची हलगर्जी व आमदारांची अकार्यक्षताच कारणीभुत असल्याचा आरोप विदर्भ विकास आघाडीचे संस्थापक अनिल जवादे यांनी केला आहे .
