
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
शहरातील निशानपुरा वार्ड,नेताजी वार्ड तसेच रंगारी वार्ड प्रभाग क्र.११ येथील शेषशाई आखाड्याचे जीर्णोद्धार विकासकामातर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते काल दि.१८ रोजी संपन्न झाला.कार्यक्रमप्रसंगी उपस्थित जुन्या काळातील काही प्रमुख पहेलवानांचा आमदार समिरभाऊ यांचेहस्ते सत्कारही करण्यात आला.
शेषशायी आखाडा ही व्यायाम शाळा गेल्या ७० वर्षापेक्षा कार्यरत आहे,याच आखाड़यातुन नामवंत असे पहेलवान तथा कुस्तीगिर घडले आहेत,आजही येथील युवकांसाठी सदर आखाडा प्रेरणास्थान आहे,परंतु ७० वर्षापासून असलेल्या या आखाड्याकडे दुर्लक्ष झाल्याने येथील वास्तुचा जीर्णोद्धार करने आवश्यक आहे.
उपरोक्त बाब कार्यसम्राट आमदार समिरभाऊ यांच्या आखाडासमितीने लक्षात आणून देताच आमदार कुणावार यांनी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत बांधकाम करण्यासाठी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी पुढाकार घेऊन सुमारे ७ लक्ष रुपये निधी मंजुर केला आहे.
सदर भूमिपूजन कार्यक्रमाचेवेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी कुंटेवार, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बिस्मिल्ला खान, प्रभागाच्या नगरसेविका
सौ.वैशालीताई सुरकार,नगरसेवक धनंजय बकाने तसेच इतर नगरसेवक,परिसरातील गणमान्य नागरिक मंडळी उपस्थित होते.
उपरोक्त भूमिपूजन कार्यक्रमाचेवेळी आमदार कुणावार हे कार्यक्रमस्थळी पोचताच बैंडबाजा लावून त्यांचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी येथील नागरीकांनी,विशेषतः युवकांनी आमदार कुणावार यांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाला आखाडा पंचकमिटी सदस्य गणेशजी बरडे, महेंद्रजी खूपसे, राजेशजी कुरेकर ,गणेशजी उपासे, दिलीपजी गाठे ,अमोलजी ठोंबरे प्रामुख्याने हजर होते.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी अतुलजी उघडे, संदीपजी सुरकार, सतीशजी तपासे, धिरजजी प्रजापती, आकाशजी तपासे ,सौरभजी गुरनुले, अभयजी गाठे, देवेंद्रजी शेंद्रे, अजयजी वाघमारे, रोहितजी पवार, अविनाशजी चंदनखेडे, विनोदजी तपासे ,सुरजजी वाघमारे ,धीरजजी कटारे, रुपेशजी गाठे ,सुरजजी शेंडे, अभिषेकजी कुबडे, वैभवजी कुकसे, मनीषजी कटारे ,पिंटूजी हटवार, अमोलजी गाठे, मयुरजी पिसे, शुभमजी शेंडे इत्यादीसह आखाडा समिति सदस्य तसेच परिसरातील मान्यवर स्त्री-पुरुष नागरिक उपस्थित होते.
