विजयगोपाल येथील दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रोड व सिमेंट नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे- जगदीशभाऊ हेंडवे अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड विजयगोपाल यांच्या वतिने मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.वर्धा यांना तक्रार दाखल

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

संभाजी ब्रिगेड विजयगोपाल शाखा च्या वतिने शाखा अध्यक्ष जगदीशभाऊ हेंडवे यांनी विजयगोपाल ता.देवळी जि.वर्धा येथील दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रोड व सिमेंट नाली बांधकाम TS NO. 484/2021 रक्कम 700000 लक्ष रुपया चे काम मंजूर असुन लोकेशन समाज मंदिर ते नामदेवरावजी तेलंगे व सिमेंट रस्ता रमेशजी पोटफोडे ते सुरेशजी वानखेडे यांच्या घरा पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम खडीकरण असुन सदर रस्ता बांधकाम करताना खोदकाम व खडीकरण न करता सिमेंट रस्त्या चे बांधकाम केले.सदर कंत्राटदारास तक्रार करुण सुद्धा कामात सुधारणा केली नाही व तसेच कनिष्ट अभियंता यांनी वारंवार तोंडी तक्रार केली असता कामात सुधार केलेली नाही.सदर कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असुन सदर कामाची चौकशी करण्यात यावी व 15 दिवसात च्या आता या प्रकाराची चौकशी न झाल्यास संभाजी ब्रिगेड विजयगोपाल सर्व गावकर्याना घेउन आंदोलन करेल असे निवेदन जिल्हा उपाध्यक्ष अशोकभाऊ वेले यांच्या मार्गदर्शनात जगदीशभाऊ हेंडवे शाखाअध्यक्ष विजयगोपाल यांच्या नेतृत्वात यांनी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प वर्धा , कार्यकारी अधिकारी अभियंता बांधकाम विभाग जि.प.वर्धा यांना दिले.
यावेळी जगदीशभाऊ हेंडवे यांच्या नेतृत्वात ,राहुलजी रधळे कोषाध्यक्ष, गणेशजी नरनवरे सहसचिव यांच्या उस्तितीत सदर कामाची चौकशी करुण कारवाई करण्या ची मागणी करण्यात आली.