
प्रतिनिधी :प्रमोद जुमडे,वर्धा
पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात वर्धा जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने स्थानिक शिवाजी चौक वर्धा येथे केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन निदर्शने व अर्धनग्न आंदोलन करण्यात आली व त्यानंतर वर्धा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, सदर निवेदन वर्धा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना पाठविन्यात आले, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या बेरेलची किंमत अतिशय कमी झाली असून ,तरीदेखील पेट्रोल व डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे आज पेट्रोल 103 रुपये प्रती लिटर वर पोहचले,त्या वाढीमुळे बाकी जीवनाश्यक वस्तू च्या किमतीत अचानक वाढ झाली असून, त्याचा असर देशातील सर्वसामान्य लोकांच्या जनजीवनावर झालेला आहे ,पहिलेच देशांमध्ये गेल्या दीड वर्षापासून कोरोनाव्हायरस या महामारी मुळे जनता भयभीत व आर्थिक विवंचनेत सापडले असून, लाखो लोकांचा रोजगार हिरावला गेला असून लॉकडाऊन काळात जनता घरीच बसून असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे व्यवसाय अर्थार्जन करता आले नाही,अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल व डिझेलची वाढ ही एक अप्रिय घटना आहे ,तेव्हा केंद्र सरकारने ही दरवाढ ताबडतोब रद्द करावी या स्वरूपाचे निवेदन जिल्हाध्यक्ष प्रमोद भोमले यांचे नेतृत्वात आम आदमी पार्टीच्या वतीने वर्धा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले,
तसेच स्थानिक शिवाजी चौक येथे भव्य स्वरूपामध्ये कार्यकर्त्यांनी एक तास अर्धनग्न,धरणे आंदोलन केले, मोदी सरकार विरोधात नारेबाजी सुद्धा करण्यात आली,पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या नारेबाजी करण्यात आली,काही नेत्यांची भाषणे सुद्धा झाली त्यावेळी पक्षाच्या वतीने तुळसीदास वाघमारे प्रकाश डोडानी मंगेश शेंडे ,दुर्गाप्रसाद मेहरे,संदीप भगत, शाहरूख पठान,रविंद्र साहू,सन्दीप ड भारे,प्रमोद भोयर, ममता कपूर,थूल साहेब अरुण महाबुधे, ,धनंजय अग्रवाल,अजय घंगारे,रमेश खुर्गे,प्रविण कलाल ,शेख कलाम,मयुर राऊत,हर्शल सहारे,प्रीती जांभूळ्कर ,
खलील भाई ई.उपस्थित होते.
