
पुरोगामी महाराष्ट्राला संत परंपरेचीची काही पार्श्वभूमी लाभलेली आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायची सवय लागलेली आहे, तर अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून प्रस्थापित धार्मिक ध्रुवीकरण करणारे पक्ष आहेत. मुख्यतः शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि मनसे यामध्ये धर्मा-धर्मांच्या नावावरती राजकारण करण्याची चढाओढ लागलेली आहे. जो काही भोंग्यांचा प्रश्न निर्माण केला गेलेला आहे आणि त्याबद्दल जनतेला चुकीची माहिती दिली जाते. अर्धवट माहिती दिली जाते. तर आज महाराष्ट्र समोर भेडसावणारे प्रश्न काय आहे, तर महागाईमध्ये महाराष्ट्रातील जनता होरपळून निघालेली आहे. तरुणांना बेरोजगारीमुळे प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तरुणांच्या आरोग्याच्या बाबतीत आपण बघितलं काय अवस्था आहे. शिक्षण नाही. वीजेची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्यामुळे महाराष्ट्रमध्ये बऱ्याच ठिकाणी विजेचे लोडशेडींग होते आहे. त्यामुळे मूलभूत प्रश्नांवर काही न बोलता धर्माच्या नावावर राजकारण हे प्रस्थापित पक्ष करत असतील. त्यांचे राजकारण करत असतील, तर मला नाही वाटत की महाराष्ट्रातील जनता यांना काही प्रतिसाद देईल. तर महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकले आहे. आमच्या जगण्याच्या प्रश्नाबद्दल या तीनही राजकीय पक्षांना काही पडलेल नाही. यांना फक्त आणि फक्त धर्माच राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे, आत्तापर्यंत हे असेच राजकारण करत आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता यांच्या या धार्मिक राजकारणाला बळी पडणार नाही, असं आम्हाला वाटतं, असे मत संभाजी ब्रिगेड वर्धा तालुका प्रवक्ता – बाळासाहेब उर्फ मिलिंद ढेवले यांनी दिले आहे.
