

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे
उब्दा येथील आरोग्य केंद्राला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची उब्दा येथील कोविड विलगीकरण केंद्राला भेट
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज दिनांक११/५/२०२१ ला उब्दा येथील जिल्हा परिषद शाळेतील कोविड विलगीकरण केंद्राला भेट दिली व गावातील कोविड रुग्णांन बद्दल माहिती जाणून घेतली व त्यांच्याशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी लसीकरणा बद्दल माहिती घेतली उब्दा येते 45 ते 59 वयोगटातील 34 टक्के लसीकरण तर 60 वर्षावरील वयोगटातील 76 टक्के करोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेले आहे त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व पात्र वयक्तीचं १००% लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या
सदर भेटीमध्ये उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी ,नायब तहसीलदार समुद्रपूर हजर होते तसेच सरपंच सौ सारिका ताई कांबळे उपसरपंच उषाताई महाकाळकर ग्रामसेवक श्री नव्हाळे ,आरोग्य सेवक श्री कोपुलवार तलाठी माहोरे, पोलीस पाटील अविनाश घोरपडे ,आरोग्य सेविका जारोंडे ,सी एच ओ नागपुरे आशा स्वयंसेविका दखणे व गावातील करोना नियंत्रण समितीचे सदस्य हजर होते.
