अडचणीत असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मदत करा,जनकल्याण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना पियुष रेवतकर यांचे आवाहन

वर्धा:-वर्धा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात व गावात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्याचबरोबर जोरदार पावसाचा असर विदर्भातील अनेक जिल्ह्यात सुद्धा पहायला मिळत आहे.अनेक जिल्ह्यात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्याने अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे.नागरिक अडचणीत आले आहे.जनकल्याण फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अडचणीत असलेल्या नागरिकांना
सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मदत करावी असे आवाहन जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर यांनी केले आहे.जनकल्याण फाउंडेशन हे नेहमी सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी काम करत असतात .कोरोना काळात जनकल्याण फाउंडेशन चे कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घराबाहेर निघून रुग्णसेवा करायचे व त्याचप्रमाणे आता सुद्धा या परिस्थिती मध्ये लोकांना आपल्या मदतीची गरज आहे आणि आपण ती मदत शक्य होईल तेवढी करायला पाहिजे असे देखील रेवतकर म्हणाले. पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या गावात जाऊन जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने अन्नधान्याच्या किटा व जेवण वाटप करणार असल्याची माहिती पियुष रेवतकर यांनी दिली.ज्या लोकांना पूरपरिस्थिती मध्ये असलेल्या नागरिकांची मदत करायची इच्छा असेल व ते या परिस्थितीत घराबाहेर निघून मदत करू शकत नाही अश्या लोकांनी 8767022075 या नंबर वर संपर्क करावा आम्ही तुमच्याद्वारे दिलेली छोटीशी मदत पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या गावातल्या नागरिकांपर्यंत पोहचवू असे जनकल्याण फाउंडेशन चे जिल्हा संघटक राहुल बागडे म्हणाले
.