९ जानेवारी ला वर्धा येथे नविन वर्षात ” तुकड्या ची झोपडी ” स्मरणिका प्रकाशित होईल प्रतिष्ठित मान्यवर यांच्या उपस्थितीत- मधुसूदन कोवे

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

एक आठवण नववर्षाची ” तुकड्या ची झोपडी ” ही स्मरणिका प्रकाशित करण्यासाठी ग्राम स्वराज्य महामंच च्या संकल्पनेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आठवणी चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि नवागत लेखकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी केला आहे.

स्मरणिका स्पंदन स्मृतीगंध प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष मा.डॉ.सौ मालिनी वडतकर आणि प्रमुख उपस्थिती मा.खा.रामदासजी तडस साहेब लोकसभा क्षेत्र वर्धा ,मा.आ.डॉ. पंकज भाऊ भोयर विधानसभा क्षेत्र वर्धा, मा.ॲड.वामनराव चटप साहेब (माजी आमदार, शेतकरी नेते) आणि मा.प्राचार्य राजेश व्ही जगताप सर ही मान्यवर उपस्थितीत राहणार आहे.

नवागत साहित्यिक श्री नागोराव काकपुरे-यवतमाळ संकेत मेंढे-अमरावती सौ प्रिती दिडमुठे-चंद्रपुर श्री गीरीधर ससनकर-राळेगाव श्रीमती शैला मिर्झापुरे-यवतमाळ श्री गोपाल गुंड-जुन्नर जिल्हा पुणे श्री गुलाबराव धांडे – नागपूर श्री सुखदेव वेठे-गडचिरोली सौ मंजु हेडाऊ-नागपुर यांच्या साहित्याला “राष्ट्रसंत माणिक रत्न पुरस्कार” देवुन सन्मानित करण्यात येणार आहे.

या नवागत उपक्रमाचे आयोजन करण्यात
” ग्राम स्वराज्य महामंच चे अध्यक्ष श्री मधुसूदन कोवे गुरुजी उपाध्यक्ष प्रा मोहण वडतकर कार्याध्यक्ष श्री गीरीधर ससनकर संचालक सदस्य सौ रेखा निमजे श्रीमती आशाताई काळे सौ श्रुती देशपांडे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविला जात आहे.