पवनार येथील तेली समाज संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घघाटन सोहळा थाटात संपन्न. तेली समाजाने संघटित होणे काळाची गरज:मा.रामदासजीआंबटकर आमदार विधान परिषद.

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

श्री.संताजी जगनाडे महाराज तेली समाज संघटन पवनार ता. जि.वर्धा. जनसंपर्क कार्यालयाचा उद्घघाटन सोहळा दिनांक ३०/४/२०२२ रोजी सायंकाळी ७.०० वा. कार्यक्रमाचे उद्घघाटक मा.आमदार डॉ.श्रीमान रामदासजी आंबटकर विधान परिषद व मा. श्रीमान अतुलजी तराळे माजी नगराध्यक्ष नगर परिषद वर्धा. यांच्या शुभ हस्ते फीत कापून व श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून तेली समाज संघटन जनसंपर्क कार्यालया चा उद्घघाटन सोहळा पार पडला.
श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज संघटन पवनार द्वारा कार्यक्रमाचे उद्घघाटक मा.आमदार डॉ.श्री रामदासजी आंबटकर विधान परिषद यांचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच माजी नगराध्यक्ष श्री.अतुलजी तराळे नगर परिषद वर्धा.यांचा सुद्धा तेली समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संताजी जगनाडे महाराजा च्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
संताजी जगनाडे महाराज तेली समाज संघटनेच्या वतीने प्रमुख मान्यवर आमदार श्री रामदासजी आंबटकर यांना संघटनेच्या वतीने पवनार गावाच्या लोक कल्याणासाठी निवेदनाद्वारे प्रमुख मागण्या करण्यात आल्या यात गावातील घन कचरा व ओला कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी एक हायड्रॉलिक टाटा एस कचरा गाडी तसेच पवनार ते केदोबा व पवनार ते बीड या दोन्ही पांदन रस्त्याचे खडीकरण करून देण्यात यावे अशी मागणी निवेदन देवून केली असता या सर्व मागण्या तत्काळ मंजूर करून पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार श्री रामदासजी आंबटकर यांचे कडून देण्यात आले. या वेळी गावा – गावा तेली समाजाच्या संघटना तयार व्हाव्या या मुळे शैक्षणिक राजकीय सामाजिक दृष्टीने फायदा होईल तेली समाज हा जगात ६७%आहे परंतु समाज विखरत असल्याने याचा फायदा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अतुल तराळे यांनी प्रत्येक गावात तेली समाज संघटनेची शाखा व्हावी समाजाने एकत्र यावे समाज संघटित होणे ही काळाची गरज आहे असे उद्घाटनाच्या कार्यक्रमा प्रसंगी नागरीकांना संबोधित करताना बोलत होते.या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष जगदीश वाघमारे यांनी केले.मनोगत गणेश हिवरे यांनी मांडले.सूत्र संचालन सौ.अल्का भुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटने चे सचिव श्री बाजीराव हिवरे यांनी मानले. या वेळी संताजी जगनाडे महाराज तेली समाज संघटन पवनार चे उपाध्यक्ष महादेव देवतळे,मुरलीधर वैद्य, अरुण खेलकर, रामदास घुगरे, सूरज वैद्य, अमोल हिवरे, महेंद्र वाघमारे, विनोद बोरकर, अरविंद महाकाळकर, विजय सुरकार, नितीन डुकरे, सुरेंद्र भट,
महिला पदाधिकारी अध्यक्ष रंजना वैद्य, विजया पाहुणे, सिमा साखरकर, अर्चना घुगरे, माधुरी उमाटे, कलावती लाडे,रंजना ईखार, माधुरी वाघमारे, ज्योती माजरे, अर्चना वंजारी, छाया पेटकर,महानंदा हुलके, मेघा ईखार,रंजना आंबटकर, इतर पदाधिकारी तसेच गावातील तेली समाजातील सर्व जाती व पोट जातीय पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली आणि सर्वांनी स्नेह भोजन आस्वाद घेऊन कार्यक्रम पार पडला.