
कारंजा (घा):-रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या शिक्षकाला वनविभागाच्या वाहनाने धडक दिली .त्यात ते जागीच ठार झाले.हा अपघात रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास कारंजा घाडगे येथे झाला.भोजराज आत्माराम गाखरे (वय 48 रा.कारंजा) असे मृत शिक्षकाचे नाव आहे .रात्री जेवण केल्यानंतर पत्नीसह बाहेर शतपावली करीत होते .दरम्यान वन विभागाच्या वाहनाने त्यांना धडक दिली .अपघातानंतर ग्रामीण रुग्णालयात कारंजा येथे उपचारासाठी नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यांना वाहनाने धडक दिली तेव्हा पत्नी बाजूला झाल्यामुळे त्या बचावल्या .गाखरे हे कारंजा तालुक्यातील सावळी खुर्द येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.या अपघातप्रकरनी वाहचालकास कारंजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
