स्थानिक प्रशासनाला व लोकप्रतिनिधीला जाग येण्यासाठी रोडवर लावले बेशरम चे झाडे

हिंगणघाट प्रतिनिधी प्रमोद जुमडे


गाडगेबाबा चौक ते वणा नदी पर्यंत जानारा रस्ता अक्षरशा चालन्या योग्य नाही.दोन वर्षे आधी नगर परिषदेने बनलेला जवळपास ३० लाखांचा सिमेंट रस्ता मलनिस्सारण गटार लाईन साठी फोडून गटार लाईन टाकण्यात आली व रस्ता फोडलेल्या ठिकाणी माती भरण्यात आली यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते त्यामूळे रस्ता आज चालन्यायोग्य नाही.तिन चार दिवसा अगोदर नगर परिषदेचे नगराध्यक्ष, दोन्ही प्रभागातील नगरसेवक या भागाची पाहणी केली व रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले पण आज पाच ते सहा दिवस झाले पण रस्ता अजूनही दुरुस्त झाला नाही.आज सकाळी जोरदार पाऊस सुरू झाला . संपूर्ण रस्त्यावर पाण्याचे डबके व चिखल पडले.म्हातार्य लोकांची फार दुर्दशा होतं आहे.काही लोक घसरुन खाली पडले. याच भागातील नगरसेवक यांची जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी नगराध्यक्ष साहेब यांची आहे कारण नगराध्यक्ष जनतेमधून निवडून आले व हिंगणघाट शहराचे नगराध्यक्ष बणले.
प्रशासन झोपेत आहे म्हणून लोकप्रतीनीधी व पार्षद पण झोपेत आहे का
म्हणुन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना जागे करण्यासाठी रस्त्यावर बेसरमाचे झाडे लावून स्थानिक नागरिकांनी निषेध करण्यात आला
बेसरमाचे झाडे लावताना सामाजिक कार्यकर्ता
रूपेश लाजूरकर, अशोक मोरे, बबलू मोरे, सुभाष कोल्हे,सुरज ढाले,अब्बास, किरण बावणे, मधुकर मोरे ईत्यादी