
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
आरोग्य सेवा सर्व सामान्य नागरिकां पर्यंत पोहोचवावी -: आमदार समीरभाऊ कुणावार
सर्व सामान्य कुटुंबातील सदस्यांना खाजगी रूग्णालयातील उपचार घेणे शक्य नाही त्यामुळे सरकारी रूग्णालयातील उपचार हा उच्च दर्जाचा असलाच पाहिजे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले त्याच प्रमाणे रुग्णालयाच्या दर्जा वाढ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून महिला रूग्णालयांची सुध्दा मागणी केली असून लवकरच पाठपुराव्याला यश मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे या शिबिरा मार्फत सर्वांना रूग्ण सेवा पुरविण्याची सुचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली त्याच प्रमाणे हिंगणघाट येथील युवा उद्योजक जे.पि.सारडा यांच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी रूग्णालय परिसरात पाणी प्याऊची व्यवस्था केली आहे त्यांचे उदघाटन आमदार कुणावार यांनी केले तसेच शिबिर स्थळी आलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य सुचना केल्या . याप्रसंगी समाजसेवक जेठानंदजी राजपूत,जे.पि.सारडा, सुनील डोंगरे,शेषराव तुळणकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कुचेवार मॅडम, मुख्याधिकारी जगताप, डॉ.चाचरकर, डॉ.रूईकर,अतुल नंदागवळी, वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी व शिबिर स्थळी आलेले रूग्ण उपस्थित होते.
