
आदिवासीचे सामाजिक,शैक्षणिक,राजकीय, आर्थिक तसेच संवैधानिक मानवीय अधिकार प्राप्त असून सुद्धा भारत देशात आदिवासीचे हनन सुरूच आहे याची दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेतली असून सन 1994 पासून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करायचे असे युनो ने घोषित केले तेव्हा पासून जगभरात मोठ्या प्रमाणात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येतो महाराष्ट्र राज्यात शासनाने काही विशिष्ट जिल्ह्यात शासकिय आदिवासी आश्रमशाळा , वसतिगृह यांचे कार्यालयात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली परंतु महाराष्ट्र राज्यातील सर्वच विद्यार्थी केवळ शासकीय आदिवासी आश्रमशाळा , वसतिगृह शिक्षण घेत नाही
आदिवासी समाज महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने वास्तव्य करतात राजस्थान सरकारने संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तेंव्हा महाराष्ट्र शासनाने 9 ऑगस्ट जगातील आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी असे निवेदन आदिवासी संघर्ष कृती समिती , यांनी तहसीलदार हिंगणघाट यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोशारी याना देण्यात आले निवेदन देते वेळीस विनोद उईके , सुभाष पुरके , नरेश उईके , शंकर मोहमारे , संजय सयाम , रवींद्र कोकुड्डे , पद्मा कोडपे , नलिनी सयाम , शशिकला उईके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
