
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
हिंगणघाट तालुक्यातील भिवापूर येथिल जिरानाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण तातडीने करावी अशी मागणी येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते जयंत कातरकर यांनी आज शुक्रवारी ११ फेब्रुवारीला प्रशासनाकडे केली असुन मागणी पुर्ण झाली नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा दिला आहे. भिवापुर येथिल जिरानाला हा दिवसेंदिवस शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण करीत आहे.या नाल्याच्या पुराचे पाणी शेतातून वेगवेग मार्गाने जाऊनले शेत जमीन निकामी होत आहे.पुराच्या पाण्यामुळे दर वर्षी मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान होते आहे.१० वर्षांपासून या नाल्याची दुरुस्ती केली नाही.तरी या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण तातडीने करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत कातरकर शेतकरी माधव कुळमते,अतुल धावडे,संजय धावडे,बालु कळसकर,मारोती ढाकरे, विठ्ठल धोटे, साहेबराव नेवारे,सुरेश भुजाडे,सुदाम कळसकर, आदिंसह शेतकऱ्यांनी संबंधीत विभागाकडे केली असुन तातडीने दुरुस्ती केली नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा देण्यात आला आहे.
