पुरसदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस तसेच गृहरक्षक दलाचे सैनिकांसाठी वना नदी पात्रात सराव शिबिराचे आयोजन

i

        

लवकरच येणाऱ्या ऋतुमानानुसार येणारा पावसाळा लक्षात घेता पुरपरिस्थिती हाताळण्याचे दृष्टीने पोलिसा तसेच गृहरक्षक दलाचे सैनिकांसाठी एका सराव शिबिराचे आयोजन स्थानिक वणा नदी परिसरात आयोजीत करण्यात आले.
सदर शिबिराचे आयोजन उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले,यावेळी तहसीलदार श्रीराम मुंदड़ा,पोलिस ठाणेदार संपत चव्हाण,नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी श्री पाटिल,अग्निशमन अधिकारी गिरीश गंडाइत,गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक श्री रोकडे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
आज दि.२५ रोजी सकाळी 11 ते दुपारी 01 वाजतापर्यंत वणा नदी पात्रात पुरग्रस्त नागरिकांना मदत करीत त्यांना जीवितहानी होण्यापासून वाचवितांनाची रंगीत तालीम घेण्यात आली.
यामध्ये ३२ पोलीस अंमलदार, ८ अग्निशमन विभाग कर्मचारी तसेच १० होमगार्ड सैनिक सहभागी झाले.