संभाजी ब्रिगेडचे बेमुदत धरणे आंदोलन. ९वा. दिवस

९ व्या दिवशी आंदोलनाला आयटक अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वर्धा जिल्हा अध्यक्षा कॉ.विजयाताई पावडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला.

उत्तम गलवा मेटॅलिक लिमिटेड’ या कंपनीतून होत असलेल्या प्रदूषणामुळे लगतच्या बरबडी, चितोडा,भुगाव,इंझाळा, सेलूकाटे, मांडवगड इ.गावातील शेतकऱ्यांच्या शेत-जमिनी नापीक झालेल्या आहेत.
वरील गावातील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रदूषणाला पायबंद घालावा, सीएसआर फंड मधून बाधित गावांचा विकास करावा तसेच महाराष्ट्र शासनाच्या २००८ च्या शासन निर्णयानुसार उत्तम गलवा कंपनीमधील एकूण नोकऱ्यांपैकी ८०% नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना (वर्धा जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना) रोजगार द्यावा या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड वर्धा जिल्ह्याच्या वतीने मागील ९ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.
बांधवांनो मागील ९ दिवसांपासून कडक उन्हात आम्ही आंदोलनाला बसलो आहे.
ही लढाई एकट्या तुषार उमाळेची नसून वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक बेरोजगार तरुणाची आहे,बाधित गावातील प्रत्येक शेतकऱ्याची आहे.
तेव्हा या लढाईमध्ये आपण सर्वांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी व्हावे असे मी आपणास नम्रपणे आवाहन संभाजी ब्रिगेड वर्धा तर्फे जनतेस केलेआहे.