
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
हिंगणघाट तालुक्यातील भिवापूर येथील माजी सरपंच माधवराव कुडमते यांच्या सोबत गांगापुर येथील सौरभ विट्टल पोहनकर यांनी मनसे राज्य उपाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांच्या हस्ते मनसेचा झेंडा हाती घेऊन ‘मनसे’त प्रवेश घेतला.
मागील महिन्यात गांगापुर येथील ग्रामस्थानी मनसेकडे तालुका संघटक जयंत कातरकर यांच्या कडे नळाच्या समस्या मांडल्या व तात्काळ सचिव यांना फोन करून समस्या दूर केल्या.गावातली वरचे रस्त्यावरील लाईट बंद होते, ते सुरू केले,गांगापुर वासीयांनी ‘अतुल वांदिले’ यांचे आभार मानले व गांगापुर येथील सौरभ विट्टल पोहनकर व भिवापूर येथील माजी सरपंच माधवराव कुडमते यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केला.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा सचिव सुनील भुते,तालुका संघटक जयंत कातरकर,पोहना सर्कलचे अध्यक्ष राजु सराटे,मारोतराव धाडवे,नितीन भुते,निखिल शेळके,निखिल ठाकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…
