दावते इस्लामी हिंदचा एक कोटी २० लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

हिंगणघाट:प्रमोद जुमडे


पर्यावरण रक्षणार्थं दावते इस्लामी हिंद द्वारा देशभरात एक कोटी ३० लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून त्या साठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम देशभर राबविला जात आहे.
देशातील सर्व राज्यात आणि शहरात या संघटने ने धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम राबविले आहे . आणि आता त्यात पर्यावरण संरक्षण च्या भूमिके तून वृक्ष लागवडीचा देशव्यापी कार्यक्रम राबविल्या जात आहे. या अंतर्गत देशातील शहर, व गावा गावात वृक्ष रोपणास सुरवात झालेली आहे. हिंगणघाट येथेही दावते इस्लामी द्वारे सुरू केलेल्या वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमामुळे आता वृक्ष रोपणाचा आकडा लाखाच्या वर गेलेला आहे. आणि हा कार्यक्रम असाच पुढे सुरू ठेवण्याचा संकल्प ही हिंगणघाट दावते इस्लामी ने केलेला आहे.
मागील वर्षी पर्यावरण संरक्षण आणि आक्सीजन ची कमतरता या भूमिकेतून हा कार्यक्रम राबविण्यात आलेला होता. आणि या वर्षी ही त्याच भूमिकेतून कार्यक्रम राबविण्यात साठी दावते इस्लामी, मदरशा सदकातुल इस्लाम आणि जामा मस्जिद चौक वर कडू निबाचे रोपटे लावून पर्यावरण संरक्षण मोहिमेस मूर्त रूप देण्यात येत आहे. ज्या साठी संघटनेच्या युवकानी देखील उत्साहाने सहभाग नोदविला आहे. हिंगणघाट येथील संघटनेच्या निगरान मोहम्मद बख्श कादरी, नदीम खान मामू, टाका मस्जिद सेक्रेटरी मक़सूद बावा, मदरसा सदाक़तूल इस्लाम चे सेक्रेटरी आबिद रज़ा, अब्दुल कदीर बख्श, ज़मीर शेख, अल्ताफ भाई, अफ़रोज़ उर्फ सोनू भाई, आमीन मलनस, मुश्ताक़ भाई, इत्यादि उपस्थित होते।