वणी येथील गिमा टेक्सटाइल जवळ पायदळ जात असलेल्या व्यक्ती ट्रकच्या धडकेत ठार

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट

हिंगणघाट:- शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील वणी येथील गिमा टेक्सटाइल जवळ आज गुरुवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हैदराबाद कडून नागपूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक क्रमांक UP 94 T6194 ने गिमा टेक्सटाइलमध्ये कामाला पायदळ जात असलेल्या कामगार आकाश मोरेश्वर मुन वय २८ वर्ष राहणार हिंगणघाट याला चिरडले यावेळी ट्रक चालकाने आकाशला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र तो त्याला वाचवू शकला नाही अशाताच ट्रक पटली झाली.अपघात होताच ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला.अपघाताची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.व अपघातग्रस्त ट्रकला जेसीबीच्या साय्याने रसत्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली.
या अपघाता संबंधी अज्ञात ट्रक चालका विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे