
हिंगणघाट प्रतिनिधी,प्रमोद जुमडे
राज्यात कोरोनाचे संकट हे दिवसेंदिवस अधिक बळावत चालल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेला मनुष्य बळाची कमतरता भासत असल्याने तीन-चार महिन्याचा आधी समुदाय आरोग्य अधिकारी पदाची भरती प्रक्रिया आपण पार पाडली. यात हजारो समुदाय आरोग्य अधिकारी(CHO) परीक्षा उत्तीर्ण करून प्रशिक्षणासाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर 100 ते 120 समुदाय आरोग्य अधिकारी प्रशिक्षण घेत आहे. या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आदेश कितीतरी वर्ष खाजगी रुग्णालयात अनुभव घेतला असल्याने ते शिक्षित आहे आणि डॉक्टरांना ते मदत करू शकतात यात कुठेतरी डॉक्टरांवर पडत असलेला ताण कमी होऊन आरोग्य व्यवस्थेला भासत असलेले कमी मनुष्यबळ पूर्ण करून रुग्णांची सुद्धा नियोजन बद्दल पद्धतीने काळजी घेता येईल करिता आपण सदर मागणीवर विचार करून प्रत्येक जिल्हा पातळीवर प्रशिक्षण घेत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांना त्या त्या जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात सेवेवर रुजू करावे. व आरोग्य व्यवस्थेवरील तान कमी करावा अशी मागणी युवा परीवर्तन की आवाज सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य चे राहुल रमेशराव दारूनकर राज्यप्रभारी यांनी उपविभागीय अधिकारी साहेब हिंगणघाट यांचेमार्फत आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय राजेश जी टोपे साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
