बोगस डॉक्टरांना युवा पत्रकार मोहसीन खान यांची चेतावणी- पैसे खाणाऱ्या डॉक्टरांना शिकवणार धडा;खाजगी रुग्णालया मार्फत आर्थिक लूट झालेल्या गरीब जनतेला संपर्क साधण्याचे केले आव्हान

हिंगणघाट शहरातील काही डॉक्टर कोरोनाच्या नावावर करत आहे जनतेची लुटमार

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट

हिंगणघाट:-कोरोनाच्या या संकटा मध्ये शहरातील काही डॉक्टर आपले कर्तव्य इमानदारीने निभवत असून स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवस रात्र रुग्ण सेवा करीत आहे.मात्र शहरातील काही नामांकित डॉक्टर या कोरोना बिमारीच्या नावाने जनतेची आर्थिक पिळवणूक करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहे.दिवस रात्र काही पैसे खाऊ डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकाकडून पैसे कसे उकळता येईल याची नव नवीन शक्कल लढवत आहे.एका एका रुग्ण कडून ३० ते ४० हजार रुपयांचे बिल काढत असून रुग्ण दगावल्यावर ही देखील रुग्णाच्या नातेवाईकाकडे पैश्याची मागणी करीत आहे त्यानंतरच नातेवाईकांना मृतदेह सोपवण्यात येत आहे.त्यातच काही बोगस डॉक्टरांनी स्वतःचे औषधी दुकान सुरू केली असून महागडी औषधी दुप्पट दरात विकत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठ्याने आर्थिक लूट होत असल्याची सद्याची परिस्थिती आहे.एकीकडे लॉकडाऊन आहे त्यात दुकाने,व्यवसाय सर्व काही बंद आहे रोजगार देखील शून्य आहे त्यात ह्या कोरोणाच्या संकटासोबत बोगस डॉक्टरांची लुटमार या मुळे गरीब जनतेचे दोन्ही बाजूने मरणेच आहे. इतक्या संकटकाळी वैद्यकीय क्षेत्रात सहभाग असलेले औषधी व्यावसायिक व रुग्णवाहिका यांची पण चांदी होत असल्याचे बोलले जाते रुग्णवाहिका मालकांनी देखील आपले दर दुप्पट केले असून रुग्णांच्या नातेवाईकांनसोबत मुजोरी करत आहे इतके पैशे लागतील नाहीतर तुम्ही दुसरी रुग्णवाहिका करून घ्या अश्या पद्धतीचे रोप झाडत आहे त्यामुळे नाईलाजाने दुप्पट दरात रुग्णवाहिका करावी लागत आहे.या सर्व बाबींवर प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा कर्ज बाजारीपणामुळे गरीब जनतेचे जीव जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.असा डॉक्टर कडून होत असलेला लूटमारीचा प्रकार जर कुठे घडत असल्यास व गरीब जनतेची आर्थिक लूट होत असल्यास शहरातील युवा पत्रकार तथा दैनिक विदर्भ केसरीचे संपादक मोहसीन खान यांनी संपर्क साधण्याचे आव्हाहन नागरिकांना केले आहे.