
आम आदमी पार्टीचा सातत्याने पाठपुरावा,
जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरण व्यवस्था सदोष असावी
वर्धा _दिनांक 5 मे
गेल्या दोन महिन्यापासून वर्धा जिल्हा आपच्या वतीने दिनांक 23 मार्च शहीद भगत सिंग शहीद दिनी जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरण व्यवस्था यामध्ये असलेले दोष ,त्रुटया ग्राहकांना पावती नाही, मशीन खराब असणे, कुठे निकृष्ट दर्जाचे धान्य वितरण, कमी प्रमाणामध्ये धान्य वितरण, दुकान उघडण्याची वेळ नाही, साठा किती ,वाटप किती त्याच्या नोंदी नाही, या संपूर्ण गैर व्यवस्थापनाच्या बाबतीत जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा अधिकारी यांना प्रथम आपच्या वतीने निवेदन देण्यात आले, यावर जिथेजिथे व्यवस्थेत दोष असल्यास सरकारी यंत्रणेने कारवाई करण्याचे आदेश दिनांक 26 मार्च रोजी काढले,
समस्त जिल्ह्यातील तहसीलदारांना आदेश निर्गमित केले व ताकीद देऊन त्यात सुधारणा करण्याचे सांगण्यात आले,
तसेच मौजा पिपरी मेघे गजानन नगर येथील स्वस्त धान्य दुकानदार पावती देत नाही, गेल्या बरेच दिवसांपासून मशीन खराब असल्याचे सांगतो, याबाबत ममता कपूर यांनी तक्रार देखील केली होती ,त्यानंतर त्या दुकानात धान्य घ्यावयास गेले असता, त्यांनी पावती ची मागणी केली त्यांना शिवीगाळ करण्यात आली त्यांनी पोलिसात तक्रार केली दुकानदारावर भादवि नुसार गुन्हा नोंदवण्यात आला त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले ,सरकारी यंत्रणेद्वारा तहसील कार्यालयाचे श्री पाथरे यांनी सोबत आपचे प्रकाश डोडानी व रवि बाराहाते यांच्यासमवेत घटनास्थळाची चौकशी केली, सदर दुकानदाराची ग्राहकाची बयाने झाली, धान्याची प्रत व वजन ,माप, पावती याबाबत विचारणा झाली
तपासणी अहवाल पुरवठा अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला, दिनांक 4 मे रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रकरण क्रमांक 24 / 2021 महाराष्ट्र अनुसूचित वस्तू (वितरणाचे विनियमन) आदेश 1975 चे कलम 3(4 )अंतर्गत आदेश काढला ,मौजा पिपरी मेघे गजानन नगर येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला,
वर्धा जिल्हा आप चा सातत्याने पाठपुरावा झाला, व संपूर्ण जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरण व्यवस्था ही सदोष असावी ,याबाबत अजूनही लढाई बाकी आहे. सरकारी यंत्रणेने यात निष्पक्ष काम केले ,संपूर्ण जिल्ह्यात शेकडो स्वस्त धान्य दुकाने आहेत ,त्यांनी या घटनेचा बोध घ्यावा व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे वेळोवेळी केलेल्या आदेशाचे पालन करावे ,जेणेकरून गरीब जनतेला न्याय मिळेल त्यांची कोणतीही तक्रार राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी ,यापुढे स्वस्त धान्य दुकानाचे बाबतीत कुठलीही तक्रार असल्याचा आम आदमी पार्टी वर्धा यांना लेखी स्वरुपात द्यावी, आम्ही जनतेशी बांधील आहोत त्यांना सरकारी यंत्रणा जरूर न्याय देईल,
अशी ग्वाही एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे वर्धा जिल्हा महिला आघाडी प्रमुख ‘ममता कपूर ,यांनी दिली.

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, वर्धा
