एन.सी.सी. च्या प्रशिक्षणातून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडते, कॅप्टन मोहन गुजरकर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

देवळी:-आपल्या देशाच्या शत्रू राष्ट्रासोबत झुंज द्यायची असल्यास तरुण पिढीला सैनिकी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून एन.सी.सी. दरवर्षी 5 लाख तरुणांना प्रशिक्षण देते. एन.सी.सी प्रशिक्षणातून अष्टपैलू व्यक्तीमत्व घडते, असे प्रतिपादन कॅप्टन मोहन गुजरकर यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या 73 व्या दिन कार्यक्रमात स्थानिक एस.एस.एन.जे. महाविद्यालयाच्या एन.सी.सी. सभागृहात 28 नोव्हेंबर रोजी केले.एन.सी.सी. चा स्थापना दिवस नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी देशभरात साजरा करण्यात येतो. या प्रसंगी एस.एस.एन.जे. महाविद्यालयाच्या वतीने छात्र सैनिकांकरीता धाव स्पर्धा, अडथळा पार प्रशिक्षण, भाषण स्पर्धा, निबंध व सैनिकी जीवनावर पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.2 कि.मी. धाव स्पर्धेत कॅडेट रोशनी गौतम, अंडर ऑफिसर गायत्री निरगुडे व दीक्षिका महेशगौरी यांनी 3 कि. मी. धाव स्पर्धेत कॅडेट अमोल भाकरे, अक्षय जबडे व भाविक आखूड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले.
अडथळा पार प्रशिक्षण स्पर्धेत कॅडेट भूषण दौलतकर, कांचन राऊत व गायत्री निरगुडे यांना तर ‘व्यक्तिमत्व विकासात एन.सी.सी. ची भूमिका’ या विषयावर भाषण स्पर्धेत स्वाती हजारे, भाविक आखूड, दीक्षिका महेशगौरी व कीर्ती भोयर यांनी प्रथम तिन क्रमांक प्राप्त केले.ड्रिल’ स्पर्धेत कॅडेट निखिल इंगोले, गायत्री निरगुडे यांना प्रथम व द्वितीय तर अमोल भाकरे व वैभवी लोंढे यांना तृतीय पुरस्कार मिळाला.सर्व विजेत्यांना एन.सी.सी. चे चषक देवून गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते. आयोजनाकरीता माजी छात्र सैनिक आसिफ शेख, रणजीत येलोरे, नीलेश थुल, योगेश आदमने व तेजस झाडे यांनी परिश्रम घेतले. संचालन गायत्री निरगुडे तर भाविक आखूड याने आभार मानले.