प्रेमभंग झाल्याने युवतीचा2W नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न,मासेमारांनी वाचविले युवतीचे प्राण

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट

लोकहीत महाराष्ट्र ग्रुप ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/Bbxpnxt6PvJ0YSHzRDc0XO

शहरातील शास्त्री वार्ड येथील २० वर्षीय युवतीने प्रेमभंगातुन वणा नदीपुलावरुन नदित उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने काही नागरिकांच्या नजरेस ही बाब आल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या युवकांनी धाव घेऊन त्या युवतीचे प्राण वाचविले.
परंतु काही सुज्ञ नागरिकांनी नदीपात्रात मासे करणाऱ्या मच्छीमाराना याची लगेच माहिती दिली,मच्छीमारांनी धाव घेऊन त्या युवतीला लगेच पाण्याबाहेर काढले. उपस्थित नागरिकांनी लगेच रुग्णवाहिका बोलावून युवतीस उपजिल्हा रुग्णालयात पाठविले,तेथील डॉक्टरांनी युवतीस वर्धा येथील रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविले