
वर्धा/प्रतिनिधी/पियुष रेवतकर
वर्धा: -वर्ध्यातील महात्मा गांधीचा सेवाग्राम आश्रम हा पर्यटन स्थळ नाही हा मोठा विचार आहे. त्याच पद्धतीने त्याच्याकडे पाहिले पाहिजे आणि एक विचार म्हणून एक आदर्श म्हणून आपण सगळ्यांनी इथे आशीर्वाद घेण्यासाठी आणि बापूनी ज्या गोष्टी भारतासाठी केल्या आहे त्यांचे पुन्हा एकदा आभार मानले पाहिजे. महात्मा गांधींनी दिलेल्या मूल्यांचा विचार करून त्याला आपल्या कृतीतून ते मूल्य दिसली पाहिजे असं काम केल पाहिजे असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. आज खासदार सुप्रिया सुळे या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.
सुप्रिया सुळे यांनी महात्मा गांधी यांच्या आश्रमात भेट देत बापुना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांनी आश्रमाच्या वतीने सुळे यांचे स्वागत केले. सुळे यांनी बापुना श्रद्धांजली अर्पण करून विविध विषयांवर आश्रम प्रतिष्ठानशी चर्चा केलीय.यावेळी सुळे यांनी मी सेवाग्राम आणि पवनारला नेहमी येत असते. इथे नेहमी येऊन मला एक वेगळी ऊर्जा मिळते. ज्या भारताच्या पुत्राने आपल्याला स्वतंत्र मिळवून दिले त्याची एक जाणीव ठेवून, त्यांनी दिलेला आदर्श ठेवून आणि तोच आशीर्वाद ठेवून मी प्रांजलपणे काम करत असते आणि पुढच्या पिढीला हा विचार पोहचविण्याचा प्रयत्न करते असं यावेळी सुळे म्हणाल्या.
