
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, समुद्रपूर
#महसूल प्रशासनाची डोळेझाक: शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना; समुद्रपूर येथील तहसीलदार का चुप?
समुद्रपूर
तालुक्यातील वणा नदीवर मांडगाव घाटासह मेनखात मांडगाव१ मांडगाव दोन येथील रेतीघाटा शासनाने लिलाव केले.या घाटांचा कॉन्ट्रॅक्ट घेताना शासकीय निवेदेत असलेले नियम व शर्तीला बगल देत अवैधरीतीने या घाटावर पोकलॅण्डद्वारे व नावेचा उपयोग करून रेती उपसा करण्यात येत आहे.या नदी नदीपात्रातून 20 फूट खोल खड्डे करून रेती उपसा सुरू आहे.याकडे मात्र महसूलसह पोलीस विभागाकडून डोळेझाक होत आहे.
या घाटावरून दिवस-रात्र दोनशे ते तीनशे ग्रास रेतीचा उपसा होत आहे.या मार्गाने दररोज शंभर ते दीडशे टिप्पर चालत आहे.एका टिप्परमध्ये 400 फूट शेतीसह वाहतूक होत आहे. एवढी रेती घेऊन हे टिप्पर मांडवाव येथील रस्त्यावरून सतत धावत आहेत.नदीच्या पात्रामध्ये नाव घालून वीस फूट खोलीपर्यंत रेतीचा उपसा सुरू आहे.नदीच्या पात्रात मोठमोठे डोह तयार झाले आहे.गुरे-ढोरे व गावातील लहान मुले खोल पाण्यात गेल्यास जीवितहाणीची भीती वाढली.या रेतीघाटाच्या व्यवसायात रेतीचा उपसा होऊन पैसा मुरत असल्याची चर्चा आहे.
सध्या उपसा होत असलेल्या रेतीघाट मांडगाव,मणगाव इथून दोन कि.मी अंतरावर असून येथे पटवारी व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे.असे असतानाही त्यांनी या रेती घाटावर थेट भेट देत पाहणी करण्याची तसदी घेतली नाही.या गोरखघंदा कितीतरी वर्षापासून सुरु आहे. या घाटावर मोठे राजकारणी लोकांचा सहभाग असल्यामुळे येथे कारवाही होत नाही अशी चर्चा नागरीक करीत आहे.यावर प्रशाषणाने लक्ष करण्याची गरज आहे.
प्रतिक्रीया
दिवरात्र मांडगाव येथील गावातील रस्त्यावरून रेतीचे अवैधरित्याने सुरू आहे.या घाटावरुण रोज १०० ते १५० गाडया अवैधरित्या उपसा सुरू प्रशासक व तहसीलदार का चूप आहे?.
नाना ढवळे नागरिक मांडगाव
दररोज रेती भरलेले शंभर ते दीडशे ट्रक या मार्गाने धावत आहे.रस्ता लहान असल्याने अनेक वेळा बैलगाडी वाहतुकीला अडचन येत असून प्रशाशनाने घाटावर चौकी लावायला पाहीजे.
भय्या बावणे
