एक महिन्या च्या आत हिंगणघाट रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या थांबा न झाल्यास रेल्वे सल्लागार समिती सदस्य पदाचा राजीनामा किरण वैद्य यांनी घेतला निर्णय

श्री किरण वैद्य ह्यांची उद्विग्नता!

रेल्वेची हेतुपुरस्सर हिंगणघाट गावावर होणारी अवहेलना पाहून सल्ला गार समिती चे सदस्य श्री किरण वैद्य ह्यांची महिन्याभरात राजीनामा देण्याची घोषणा पाहून रेल्वे विषयी संताप निर्माण होतो।सदस्य झाल्यापासून ते सतत हिंगणघाट चे प्रश्न वर मांडत आहेत।आमदार,खासदार मार्फत तसेच सरळ वरच्या अधिकाऱ्यांसमोर देखील ते सतत प्रयत्न करीत आहेत।पण कोणतेच यश न मिळाल्याने शेवटी त्यांनी हा निर्णय घेतला असावा।पण हा केवळ त्यांचाच अपमान नसून सर्व हिंगणघाट वासीयांचा अपमान आहे। आता सर्व जनतेने मिळून नवी दिशा ठरविली पाहिजे।नाहीतर येथे कोणतीच गाडी थांबणार नाही।
रेल्वे मध्ये कोणीतरी झारीतील शुक्राचार्य असावेत,जो नेहमीच आडकाठी करीत असावा असे वाटते।वास्तविक पाहता रेल्वे ही सार्वजनिक संपत्ती आहे,पण काही लोक स्वतःची मालमत्ता असल्यासारखे वागणूक देत आहे।नोकरशाही जनतेवर हावी असल्याचा हा परिणाम आहे।
श्री वैद्य ह्यानी एकदम टोकाची भूमिका घेऊ नये असे वाटते। आतातरी आपले नेते जोमाने प्रयत्न करतील अशी आशा आहे