केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या संकेत वाघे याचा आमदार समीरभाऊ कुणावार यांनी केला सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

           

शहरातील संकेत वाघे या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधे राष्ट्रीय स्तरावर २६६ वा क्रमांक मिळविल्याबद्दल आज दि.०१ रोजी त्याचे निवासस्थानी भेट देऊन संकेत वाघे याचा हॄदय सत्कार केला.
यावेळी वाघे कुटुंबिय,परिसरातील नागरिक तसेच कार्यक्रमांमध्ये भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस, अंकुशभाऊ ठाकूर , भाजपा महामंत्री सुभाषजी कुंटेवार,भाजपा शहराध्यक्ष आशिषजी पर्वत, सोनूजी पांडे, अतुलजी नंदागवळी, स्वप्नीलजी शर्मा, स्वप्निलजी सुरकार, बाळू वानखेडे, दिनेश वर्मा, अनिल गहेरवार इत्यादी कार्यकर्ते सत्कार समारोह कार्यक्रमा करीता उपस्थित होते…
आमदार समिरभाऊ कुणावार यांनी संकेत वाघे यास शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या छोटेखानी समारंभाच्या समरोपानंतर आमदार समिरभाऊ कुणावार यांनी केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश कसे मिळविले याची माहिती जाणून घेतली.तसेच
संकेत वाघे याने मिळविलेले यश शहरातील विद्यार्थी तसेच युवकांसाठी प्रेरणादायी ठरावे,असे मनोगत व्यक्त केले.