हिंगणघाट शहरातील संत चोखोबा वार्डात गोळीबार,आरोपीस व जख्मी फिर्यादी युवकास पोलिसांनी जूनोणा घाटावरून घेतले ताब्यांत

आरोपी:भूषण देवतळे
जखमी:मोहन भुसारी

जख्मी करून जबरीने गाडीवर बसवीत केलें फिर्यादीचे अपहरण

बंदूक उलटी करून डोक्यावर प्रहार केल्याची माहिती

       

हिंगणघाट शहरातील संत चोकोबा येथे आज सकाळी अकरा वाजता घरातून बाहेर बोलवीत बावीस वर्षाच्या युवकावर गोळीबार केला असल्याने गावात दहशतीचे वातावरन निर्माण झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपीच्या मागावर पोलिस निघाली असता आरोपी हिंगणघाट नजीकच्या जुनोना घाटावर जख्मी युवका सोबत मिळून आले. मोहन प्रकाश भुसारी वय 22असे जख्मी युवकाचे नाव असून तो संत चोखोबा वॉर्ड येथे राहतो.

गांजा पिने व चोऱ्या करणे सराहित प्रवृतीतील हे आरोपी व जख्मी युवक असल्याची माहिती समोर आली आहे व यांच्या विरुद्ध विविध प्रकारच्या गुण्याची नोंद असून मोहन भुसारी यास जख्मी करूंन यातील आरोपी हे बाळजबरीने त्याला गाडिवर बसवीत त्यांचे अपहरण करून त्याला घेउन गेले होते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यावर
बंदुकीच्या खालच्या बाजूने मोहन च्या डोक्यावर वार केला असल्याचे उघडं झाले आहे. . मात्र मोहन भुसारी यांच्या घरासमोर रक्ताचा सडा पडलेला होता. व आजू बाजूच्या नागरिकांना बंदुकीची गोळी चालली असल्याचा आवाज आला होता. काहीं युवकांनी बंदुक देखील आरोपी जवळ बघितली असल्याची माहिती पोलिसांना दिली. ही घटणा सकाळीं 10.45च्या दरम्यान घळली असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक गोळीचा आवाज आल्याने घराबाहेर पडले होते. यावेळी काही युवक जबरीने मोहन भुसारी ला दुचाकीवर बसवित पळून जाताना दिसून आले. गोळीबाराची घटना घडल्याच्या बातमीने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती .पोलीस उपविभागीय अधिकारी व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले होते. प्रगटीकरण शोध पथकाचे प्रमुख विवेक बन्सोड शेखर डोंगरे प्रशांत भाईमरे हे विविध मार्गाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर आरोपी व फिर्यादी चा शोध घेण्यास निघाले असता
हिंगणघाट नजीकच्या जूनोना घाटाजवळ प्रगटीकारण पथकाचे प्रमुख यांनी आरोपी व फिर्यादी ताब्यात घेतले असून जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी घटनास्थळाला भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम ठाणेदार संपत चव्हाण पोलिस उपनिरीक्षक प्रशांत पाटणकर विवेक बन्सोड शेखर डोंगरे प्रशांत भाईमरे यांनी आरोपी भूषण देवतारे , प्रणय कुतरमारे यांना तब्येत घेतलें असून त्यांचा विरुद्ध विविध कलमंवये गुण्याची नोंद करून या गुण्यातील अन्य फरार आरोपीचा शोध पोलीस करीत आहे.