शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट

हिंगणघाट:- दिनांक ०६/०६/२०२१ रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने मानधनिया हॉस्पिटल हिंगणघाट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटक म्हणून डॉ.श्री.श्रीगोपाल मानधनीया होते.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.श्री.प्रतीक उत्तरवार,श्री.सतीश नक्षिणे,श्री.दिनेश मानधनिया कार्यक्रमाला लाभले होते.या शिबिराचे आयोजन जय जवान जय किसान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.आकाश बोरीकर,तालुका अध्यक्ष श्री.दिनेश नगराळे,शहर अध्यक्ष श्री.अक्षय वानखेडे यांनी केले असून या शिबिरात वैभव बोरीकर,अभिजीत बोरीकर,प्रज्वल आदमने,गौरव पुसदेकर,अमोल डूडूरकर,सुमित कळसकर,अंकित दारुंडे,गणेश निमंकर, करन पठारकर समवेत अन्य रक्तदात्यांनी रक्तदान केले.