
सांगा जिल्हाधिकारी मॅडम ? तुम्ही लावलेला लॉकडाऊन हा लॉकडाऊन नसून गरिबांच्या भुकेचा शटडाऊन आहे…
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे
मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची नियमावली जाहीर करून जिल्हाधिकारी मॅडम यांच्याद्वारे जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. आधी १३ तारखेपर्यंत असणारा लॉकडाऊन आणखी वाढवून १८ तारखेपर्यंत करण्यात आला आणि नंतर त्यामध्ये आणखी वाढ करून तो आता लॉकडाऊनचे निर्बंध 1 जूनला हटवण्यात येणार आहे. हे सर्व कश्यासाठी प्रशासन करत आहे. तर कोरोनाची रुग्णसंख्या व मृत्युदर कमी करण्यासाठी.
पण जो परिवार दोन वेळच्या जेवणासाठी हाताला जे काम मिळेल ते काम २०० रुपये रोजीने दिवसभर काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतो तो परिवार आज भुकेने व्याकुळ झाला आहे. कारण लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने-आस्थापने बंद असल्याने हाताला काम मिळत नसल्याने कुटूंब दोनवेळच्या भाकरीसाठी हवालदिल झाला आहे. यातूनच हिंगणघाट तालुकात १२ दिवसांत ३ आत्महत्या झाल्या याला जबाबदार कोण ? जगण्याची ईच्छा आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी त्या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची सुद्धा होती पण व्यवस्थेने त्यांचे बळी घेतले.
मोलमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या घरातील कर्त्या पुरुषाच्या हाताला काम मिळत नसल्याने आणि घरी बायको, मुलं बाळ आशेने वाट पाहत असल्याने पण या लॉकडाऊनमुळे खाली हात ती घरी जात असल्याने मुलांच्या निरागस प्रश्नाला देण्यासाठी उत्तर नसल्याने आत्महत्येसारखे कठोर पावले उचलायची वेळ त्याच्यावर आली.
भूक ही अशी आग आहे जी वातानुकूलित खोलीमध्ये बसून व्यवस्था हाकणार्या व्यक्तीला त्या भुकेची दाहकता समजणार नाही..
प्रशासन फक्त आणि फक्त कोरोनालाच प्राथमिकता देत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा कोरोना जर का ५ वर्ष गेला नाही तर मग आपण ५ वर्ष लॉकडाऊन लावाल का ?
गरीब रोजमजुरी करणारे कोरोनाने नंतर मरेल हो पण आत्ता भुकेने मरत आहे त्याचे काय ?
आपण समजून घेण्याचा मानसिकतेत आहेत की समजून घेण्याची तुमची मानसिकता नाही हे सुद्धा एकदाचे सांगून द्या..!!
श्रीमंत वर्गाचे ठीक आहे त्याच्याकडे धान्य पैसा सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात श्रीमंतांच्या मागणीला तुम्ही प्रामुख्य देऊन श्रीमंतांना वाचवण्यासाठी गरिबांना मरणाच्या दारात लोटण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ?
आता तुम्ही म्हणाल की कुठलाच गरीब भूकमरीने मरत नाही आहे. कारण सरकार स्वस्थ धान्य दुकानातून शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य देत आहे. आहो जिल्हाधिकारी मॅडम गहू,तांदूळ दिल्यानेच भूक मिटणार आहे का ? सरकारने दिलेले गहू पीठ गिरणीवर नेण्यासाठी त्या गरीब परिवाराकडे पैसे तर पाहिजे ना की तो कच्चे गहू खाणार आहे.
नाही निदान थोडातरी या गरीब परिवाराचा विचार करा हो…!!
नाहीतर एकदाच सांगून तरी टाका की व्यवस्थेचा यमराज गरिबांच्या मृत्यूसाठी हपापलेला आहे म्हणून निदान आम्ही व्यवस्थेकडे तक्रार तरी करणार नाही…
प्रश्न बरेच आहे पण तुम्हाला कितीही सांगितले तरी ते तुम्ही ना ऐकणार आणि नाही ऐकून घेणार पण लॉकडाऊनच्या काळात होत असलेल्या आत्महत्येला फक्त आणि फक्त प्रशासन दोषी आहे हा माझा आरोप आहे. आणि त्या परिवाराला उघड्यावर पाडणारे खरे खुनी तुम्हीच आहे…….
तुम्ही गरिबांचे मारेकरी आहेत
लॉकडाऊन हटवा, गरिबांना वाचवा
