
हिंगणघाट- येथील न्यू म्युनिसिपल कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक डॉ. अनिस बेग यांना बालरक्षक प्रतिष्ठान भारत द्वारा राष्ट्रपिता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षक आमदार श्री नागो गाणार यांच्या हस्ते अग्निहोत्री कॉलेज वर्धा येथे प्रा. डॉ. अनिस बेग यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. रमतकर संचालक, विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, डॉ मंगेश घोगरे प्राचार्य जिल्हा प्रशिक्षण संस्था वर्धा, श्री सूर्यवंशी सर जिल्हा प्रशिक्षण संस्था नाशिक, प्राचार्य मेघश्याम ढाकरे विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर,तसेच देशातून व बाहेर देशातून आलेले बालरक्षक उपस्थित होते. बालरक्षक प्रतिष्ठान हे शाळाबाह्य व दिव्यांग मुलांसाठी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय नोंदणीकृत एकमेव संस्था आहे. कोरोना काळात सर्व शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण व्यक्तींना जोडून सतत ऑनलाईन शैक्षणिक कार्यक्रम घेऊन फार मोलाचे कार्य केले. या सन्माना बद्दल डॉ अनिस बेग यांचे प्राचार्य भोले, प्रा. ढगे, सुनील फुटाणे, आनंद साखरे, शरद जाधव, प्रा नूरसिंग जाधव,प्रा जयंत ढगले,प्रा अभिजित डाखोरे, प्रा दिवटे, प्रा पुसदेकर, प्रा ठाकडा, प्रा बोदेले, प्रा अजय सावरकर, प्रा अली, अजय वानखेडे, अजय भोयर, प्रा. उमेश ढोबळे, प्रा नूतन माळवी व सर्व सहकारी मित्र यांनी अभिनंदन केले असून समाजातील सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांनी या सम्माना बद्दल बालरक्षक प्रतिष्ठान भारत चे सर्व सदस्य, पदाधिकारी, डॉ. राणी खेडीकर मुंबई, मनोज चिंचोरे सर जळगाव व नरेश वाघ सर वर्धा यांचे आभार मानले.
