
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे,समुद्रपूर
समुद्रपूर:
कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव त्यातच वाढत असलेली रुग्ण संख्या या सर्व बाबी लक्षात घेता समुद्रपूर येथील समाजसेवक श्री अशोक डगवार यांनी स्व: खर्चातून साठ बेडचे कोविड सेंटर उघडण्याचा निर्णय घेतला तशा आशयाची मागणी मा.पालक मंत्री सुनिल केदार यांचे कडे केलेली आहे.
कोविडच्या पहिल्या लाटेत समाजसेवक यांचे वडीलांचा प्राण या कोरोण्याच्या लाटेत गमवावा लागला तर त्याच्या सपूर्ण कुटुंबाला कोरोनाचा सामना करावा लागला अशातच त्यांनी या दुसऱ्या कोरोणाच्या लाटेत मुळे कोण्या रुग्णाची हेळसांड होऊ नये म्हणून समाजाचे उत्तरदायित्व समजून या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णावर योग्य उपचार व्हावा म्हणुन त्यांनी समुद्रपूर येथे साठ बेडचे कोविड सेंटर स्वःखर्चातून उभारण्याचा निर्णय घेतला…
