हिंगणघाट शहरात पुरपिडीत लोकांना सिटी सर्व्हे करून पट्टे नावी करून द्या -राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना मागणी

प्रतिनिधी:दिनेश काटकर,हिंगणघाट


सन १९८६ मधी हिंगणघाट शहरात आलेल्या पुरा मध्ये अनेक लोकांना आपली घर गमवावी लागली. त्या वेळी मा. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना पुरपिडीत लोकांना शासणा तर्फे क्वार्टर घर देण्यात आले . याच संदर्भात आज हिंगणघाट राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेस पदाधिकार्यांनी शहरातील पुरपिडीत क्वार्टर धारकांचा सिटी सर्व्हे करून लवकरात लवकर त्यांना त्यांचे पट्टे नावी करून द्या ही मागणी वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक तथा नगरविकास ऊर्जा,आदिवासी उच्च तंत्र शिक्षण विभाग,पुर्नवसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे साहेब यांचे वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा दरम्यान हिंगणघाट शहर राष्ट्रवादी विधयार्थी काँग्रेस चे शहर उपाध्यक्ष युवराज माऊसकर यांनी केली.