“आमदार समीरभाऊ कुणावार यांनी विधानसभेत मांडला ग्रामिण भागातील खराब झालेले रस्ते व कंत्राटी अभियंत्यांच्या पगाराचा मुद्दा”

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

आज विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहामध्ये ग्रामविकास मंत्रालयाव्दारे कार्यान्वीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व इतर रस्त्यांबाबतच्या मोठ-मोठया योजनेतील काम पाहणारी यंत्रणेतील जबाबदार अधिकारी जसे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता हे सर्व कंत्राटी पद्धतीने काम करीत असून त्यामुळे यांचे संबंधित काम करणाऱ्या कंत्राटदारावर योग्य नियंत्रण राहत नसल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही ? आणि महत्त्वाची बाब म्हणजे यासंबधीत अभियंत्यांचे पगार मागील एक वर्षापासून झालेले नाहीत हा त्यांचावर एकप्रकारे अन्यायचं असून यासंबंधी शासनाने तात्काळ लक्ष देण्याची सुचना करत कंत्राटी अभियंत्यांच्या पगारा संदर्भात शासनाचे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे कामाच्या करारनाम्यानुसार काम न झाल्यास झालेल्या कामाच्या तक्रारीनुसार जिल्ह्यातील मुख्य कार्यपालन अधिकारी व कार्यकारी अभियंता यांना कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात यावी अशी मागणी केली असून आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या प्रश्र्नाला उत्तर देताना ग्राम विकास मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यासंबंधी निर्णय घेणार असल्याचे सभागृहात सांगितले.