
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट
मनसे वर्धा जिल्हाअध्यक्ष अतुल वांदिले यांनी काल सायंकाळी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांना फोन केला व वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मध्ये डॉ राहुल मरोठी यांचे चांगले हॉस्पिटल आहे त्यात सध्या कोविड रुग्णांसाठी 10 बेड आहेत , त्यांना किमान अजून 25 बेड ची परवानगी मिळवून द्या त्यांची तयारी आहे मात्र जिल्हा प्रशासन परवानगी देत नाही त्यांनी सर्व प्रयत्न केले आपण केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी साहेबांशी ही बाब बोला,त्यानुसार अतुल वांदिले व हिंगणघाट येथील मान्यवर डॉक्टर हेमंत गडकरी यांचे सोबत मा नितिनजी गडकरी यांना भेटले,गडकरी साहेबांनी त्वरित जिल्हाधिकारी वर्धा यांना फोन करून 25 बेड ची परवानगी मिळवून दिली व तुमच्या कडे सध्या किती व्हेंटिलेटर आहेत असे गडकरी साहेबांनी डॉ.मरोठी यांना विचारले डॉ मरोठी यांनी 2 व्हेंटिलेटर आहेत असे सांगताच अजून मी 2 व्हेंटिलेटर देतो हेमंत जी ताबडतोब घेऊन जा व रुग्णसेवेसाठी कामात आणा असे सांगितले हे ऐकताच उपस्थित सर्व अवाक झाले, आम्ही बेड वाढवून घेण्यासाठी आलो ते काम तर झालेच पण सद्या दुर्मिळ पण अत्यावश्यक बाब असलेले 2 व्हेंटिलेटर व इतर साहित्य (अंदाजे किंमत 25 लाख) हे मिळाल्याबद्दल हिंगणघाट येथील डॉक्टर यांचा आनंद गगनात मावेना ,त्यांनी ही अविस्मरणीय भेट घडवून आणल्याबद्दल व रुग्णसोयीच्या दृष्टीने बाजू मांडल्या बद्दल हेमंत गडकरी व अतुल वांदिलें याचे आभार व्यक्त केले आजचे दिवस कोविड च्या नकारात्मक वातावरणात राजकारण,पक्षभेद या संकुचित विचाराला भेद देऊन अजूनही माणुसकी जिवंत आहे याचा प्रत्यय देऊन गेला…
