महाडीबीटी योजने अंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांची शासनाने केली थट्टा :- अक्षय इंगोले

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे

महाडीबीटी पोर्टल द्वारे मागील महिन्यात सर्व शेतकऱ्यांना सबसिडी मध्ये बियाणे मिळण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तसेच अर्ज जास्तीत जास्त प्रमाणात भरण्यासाठी कृषी सहायक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा केले. त्यानुसार शेतकऱ्यांनी पोर्टल ची फी भरून इंटरनेट कॅफे वरून फॉर्म भरून घेतले. काही दिवसात प्रत्येक गावातील काही शेतकऱ्यांची लाभार्थी मध्ये सरकार द्वारे सोयाबीन व तुरीचा बियाणे मिळण्यासाठी निवड सुद्धा करण्यात आली व निवड झालेल्या शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक द्वारे निवड झालेल्या वाणाचे परमिट सुद्धा देण्यात आले.परंतु ज्यावेळी शेतकरी परमिट घेऊन शासनाने सूचित केलेल्या वडनेर येथील कृषी केंद्रात बियाणे घ्यायला गेले असता तिथे शासन निवडक वान आमचा कडे उपलब्ध नाही आहे तर दुसरे वान घेऊन जायचं शेतकऱ्यांना सुचविण्यात येत आहे. ऐन पेरणीचा वेळी शेतकरी अशा गैरप्रकारांमुळे अडचणीत सापडला आहे आता जर शेतकऱ्यांना शासन बियाणे पुरवू शकत नाही तर अशा प्रकारच्या पोकळ योजना राबून शेतकऱ्यांची थट्टा उडविणे थांबवावी तसेच पेरणी चा हंगामात त्यांचा वेळ घालून आर्थिक रित्या आणखी कमजोर करण्याची व विवंचनेत टाकण्याची भूमिका राज्य सरकार तसेच जिल्हा व तालुका कृषी विभागाने नाही घ्यावी असे मत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद जिल्हा संघटक अक्षय इंगोले यांनी मांडले तसेच शासनाने हा बियाणे परमिट चा मुद्दा त्वरित सोडून शेतकऱ्यांना योग्य ते परमिट नुसार वान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.