हिंगणघाट तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला, येथे प्रजासत्ताक दिन साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

हिंगणघाट तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला, येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘संविधान उद्देशिका’याचे वाचन करण्यात आले राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहन माननीय श्री जयंतभाऊ भै. कातरकर अध्यक्ष शाळा व्यस्थापन समिति येरला यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री कुंभार सर मुख्याध्यापक यांनी केले तसेच श्री पेंदोर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त माहिती सांगितली तसेच अध्वक्षीय भाषणामध्ये माननीय श्री जयंतभाऊ भै. कातरकर यांनी भारतीय संविधानावर आणि कलमावर माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे संचालन श्री बारापात्रे सर यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित गावातील प्रथम नागरिक माननीय सौ अस्मिता ताई पंधरे सरपंच, माननीय श्री मेघशामजी झिले उपसरपंच, तसेच माननीय श्री अनिल राव खंडाळकर उपाध्यक्ष, श्री अमोलराव सु.तेलंगे, श्री शंकरराव बा. भोकरे, श्रीमती शुभांगीताई नगराळे, सौ प्रणिता ताई वि आडे, सौ मंगलाताई जोगी, श्रीमती सीताताई टापरे, सौ सुनीताताई उमाटे, पालक वर्ग व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्वांचे आभार शाळेतील शिक्षिका कु.पाल यांनी मानले. च्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.