
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे
समुद्रपूर जाम वासियांची पाण्यासाठी भटकंती… समुद्रपूर जांम येथे भीषण पाणीटंचाई भासत असल्यामुळे लोकांमध्ये आक्रोश निर्माण होंण्या सारखी परस्थिती आज प्रशासनाने जनतेसमोर आणली आहे. कोरोणा महामारी ने सगळीकडे हाहाकार मचवीला आहे. परंतु सध्या स्थिती जर बघितली तर कोरोना एकीकडे व अधिकारी, कर्मचारी, व प्रशासन स्वतःची जिम्मेदारी सोडून एका वेगळ्याच मार्गाने जाताना दिसत आहे. बिमारी ने कमी व जनता बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती, दहशत, नाकामी व्यवस्था, नाकाम अधिकारी व काही राजकीय नेत्यांच्या खोट्या, खोकल्या आश्वासनाने जनता त्रस्त झाली आहे. साधे अन्न, पाणी, निवारा, ह्या मुबलक सोय उपलब्ध करून देता येत नाही तर असे नेते कोणत्या कामाचे असा जनतेचा सवाल आहे. याचे उत्तर निकामी नेत्यांनी द्यायला पाहिजे, आज जे हाल जनतेचे होत आहे. त्याला कोन जिम्मेदार, समुद्रपूर, जाम, हिंगणघाट ह्या गावांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीतच अशी भीषण पाणीटंचाई होत असेल तर अजून उन्हाळा बाकीच आहे या समस्येकडे वेळेवर लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. नाही तर जनता जनताच आहे असे जाम वासीयांचे म्हणणे आहे.
