अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची हिंगणघाट नगर नुतन कार्यकारिणी गठीत

.

दिनांक ४ ऑगस्ट बुधवार ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंगणघाट नगर नुतन कार्यकारिणी संदर्भात महत्वपूर्ण बैठक येथील अ.भा.वि.प कार्यालयात पार पडली त्यात जिल्हा संघटन मंत्री शिवेशजी हारगोडे, पुर्व नगरमंत्री लीलाधरजी मांडवकर, पूर्व सहमंत्री भुषणजी आष्टणकर,पुर्व विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य गौरवजी तांबोळी यांनी नुतन कार्यकारिणीची घोषणा केली.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी संघटना असून गेल्या ७२ वर्षा पासुन शैक्षणिक क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.स्वामी विवेकानंद व माता सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून बैठकीस सुरुवात झाली.यावेळी अ.भा.वि.प पुर्व कार्यकर्ते व मार्गदर्शक श्री नितीन सुकळकर सर यांनी परिषदेच्या कार्यपद्धती विषयी मार्गदर्शन केले. व अ.भा.वि.प पुर्व अध्यक्ष व मार्गदर्शक श्री किशोर चौरे सर यांनी परिषदे विषयी उद्बोधन केले.तर खत्री कॉम्प्युटर टायपींग इन्स्टिटय़ूट चे संचालक व अ.भा.वि.प पुर्व कार्यकर्ते श्री संजय खत्री यांनीदेखील मार्गदर्शन केले.नुतन कार्यकारिणी
नगरमंत्री कीर्तेश साबळे, सहमंत्री ओम भोमले, सहमंत्री सनी बासनवार, महाविद्यालयीन प्रमुख संदीप कोल्हे, महाविद्यालयीन सह प्रमुख सुबोध उरकुडे, कार्यालयीन मंत्री वैभव वानकर, एस एफ एस प्रमुख मनोज तडस, एस एफ डी प्रमुख आदित्य मानकर, सोशल मिडीया प्रमुख अरविंद ढगे, स्वाध्याय मंडळ प्रमुख अविनाश थुटे, सदस्य राम तिखट, साहील अवघडे,
सुजल घोडे, तेजस लांबट यांची घोषणा करण्यात आली.तर पूर्व कार्यकर्ते योगेश्वर जीकार यांनी ‘छात्र शक्ती भारत है’ हे गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. नुतन कार्यकारिणीचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्व क्षेत्रातून स्वागत व अभिनंदन होत आहे.