
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट
शेतातील चोरी गेलेला 150 की. लसन आरोपीच्या ताब्यातून हिंगणघाट पोलिसांनी केला जप्त . दि.11/05/2021 च्या रात्री निवानंद मोहारे यांचे शेतातील बंड्याचे कुलूप तोडून लसणाचे 05 कट्टे ,वजन 150 किलो किंमत 15000 रु.चा माल कोणीतरी चोरून नेल्याची घटना घडली. त्यानुसार गुन्हा दाखल होताच पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रथम प्रमुख पो. हवा. शेखर डोंगरे व त्यांच्या पथकासह हिंगणघाट शहर व लगतचे परिसरात सतत माहिती काढून अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मालाच्या शोध घेतला असता, सदर गुन्ह्यातील चोरून नेलेले लसनाचे कट्टे भीमनगर वार्ड, हिंगणघाट येथील राहणारा अमोल यादवराव वडे यांच्यावर संशय असल्याने त्या सदर डीबी. पथकाने ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. असता आरोपी नामे अमोल यादवराव वडे. वय. 33 वर्ष. राहणार. भीमनगर वार्ड. हिंगणघाट याने सांगितले की, सदरचे लसणाचे कट्टे त्याने चोरले असून ते कट्टे त्याच्या घरी ठेवले आहे. त्यावरून डी.बी. पथक अमोल बडे यांच्या घरी जाऊन शहानिशा करून त्याचे ताब्यातून सदरचे लसणाचे पाचपोते एकूण 150कीलो,एकूण जु. कि.15000/- रू चा माल जप्त करण्यात आला. सदरच कामगिरी पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डी बी पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, न.पो.शी.निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे,विशाल बंगाले, पो.शी. सचिन भारशंकर यांनी केले आहे.
