
वर्धा:- जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व संभाजी ब्रिगेड पार्टी चे युवानेते पियुष रेवतकर यांच्या जन्मदिवसानिमित्त वर्धा येथे जनकल्याण फाउंडेशन चे वर्धा जिल्हाध्यक्ष व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश मेंघरे यांच्या मार्गदर्शनात व पियुष रेवतकर विचार मंचाचे कार्यकर्ते शुभम जाधव यांच्या नेतृत्वात वृक्षारोपण करण्यात आले.दरवर्षी 11 जुलै ला पियुष रेवतकर यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो .त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा त्यांचा वाढदिवस जनकल्याण फाउंडेशन तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येणार आहे.या निमित्त आज वर्धा येथे ऐकून 15 वृक्षारोपण करून सामाजिक वणीकरणाचा संदेश देण्यात आला.वाढदिवस हा केक कापून नाही तर झाडे लावून साजरा करायला हवा ,केक कापणे आपली संस्कृती नाही कृपया हे टाळावे असे मत शुभम जाधव यांनी व्यक्त केले.यावेळी रमेश मेंघरे ,शुभम जाधव ,अजय उईके आदी जनकल्याण फाउंडेशन चे तथा पियुष रेवतकर विचार मंचाचे कार्यकर्ते वृक्षारोपण करतांना उपस्थित होते.
