हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा वर्धा जिल्हा प्रभारी सौ.आसावरी देशमुख यांनी आज आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली सदर बैठकीमध्ये संघटन वाढीच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सुचना त्यांनी केल्या त्याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री नबाब मलिक यांना दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनेच्या काही देशद्रोही लोकांशी जमिन खरेदीचा व्यवहार झाल्यांने जी अटक झाली त्यामुळे त्यांच्या तातडीने मंत्रीमंडळातून राजीनामा घेण्यात यावा ‌या मागणीचे निवेदन तहसीलदार हिंगणघाट यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना सोपविण्यात आला वरील कार्यक्रमात सर्वश्री किशोरभाऊ दिघे, जिल्हा महामंत्री भाजप, जिल्हा परिषद सभापती सौ.मृणाल माटे, पंचायत समिती सभापती सौ.शारदा आंबटकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.मंजुषा दुधबडे,माया उमाटे, सुभाष कुंटेवार,आशिष पर्बत शहराध्यक्ष भाजप, सौ.अनिता मावळे महिला आघाडी अध्यक्षा भाजप, नगरसेविका छाया सातपुते,रविला आखाडे, शुभांगी डोंगरे,वदंना कामडी, शितल खंदार, वैशाली सुरकार, शारदा पटेल,अर्चना जोशी, पंचायत समिती सदस्य वैशाली फुलके,सौ.मडावीताई, अल्पसंख्याक आघाडीच्या कौशर अंजूम, वैशाली पंलाडे, सारिका उभाटे,कल्याणी ईटणकर,अनिल गहेरवार,ज्ञानेश्वर भागवते, मारूती साठे,किशोर रोंगे,अनिल मावळेआदी महीला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते