हिंगनघाट तालुक्यातील कुटकी-आर्वि (छोटी)-काचनगांव रोडला खड्डे की खड्ड्यात रोड परिस्थिती

प्रतिनिधी:दिनेश काटकर,हिंगणघाट

मागील 2 वर्षांपासून कुटकी-आर्वि छोटी-काचनगांव या रोडवर शेकडोच्या संख्येने मोठ-मोठे खड्डे पडले आहे. याकडे प्रशासन संपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. संबंधित रस्तावर 4 महिन्यापूर्वी मुरुम टाकून खड्डे बुझविण्यात आले होते आणि त्यानंतर काही दिवसातच खड्यांतील मुरुम निघाला व संपूर्ण रस्ता खड्ड्यात गेल्याच दिसून येत आहे. आता पावसाळात हेच खड्डे सामान्य जनतेसाठी जीवघेणे ठरणार. तसेच या खड्ड्यामुळे जर कुणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार.या रस्त्यावर टोलनाका वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.या वाहतूकीने अपघात घडुत येत असताना त्यात आता खड्ड्याची भर पडली आहे .
या रोडच्या रुंदीकरण बाधकामाचे टेंडर दोन वर्षांपूर्वी झाले असून या टेंडर च्या विरुद्ध कोर्टात केस सूरू असल्याने या टेंडरला कोर्टाने स्टे दिला आहे.तरी संबधितांनी याकडे लक्ष घालुन लवकरात लवकर स्टे हटवुन रोडचे काम सुरू करावे….

सतिश अं कापसे
वि.रा.आं.समिती युवा आघाडी अध्यक्ष (अल्लिपूर सर्कल)