
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही ग्रामपंचायत अंतर्गत सेलु (शेकापुर ) येथील काही प्रतिष्ठित गावकऱ्यांनी आज दि.3 सप्टेंबर रोजी भाजपामध्ये आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात प्रवेश घेतला.
आमदार समिर कुणावार यांनी यावेळी सर्व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा देत कोणत्याही कामासाठी सहकार्य करण्यासाठी सदैव पाठीशी असल्याचे सांगितले.
सेलु येथील स्वप्नील तुरणकर, सतिश बोरकर, रोशन सोनारकर, अमित बोरकर, बाबाराव विरुळकर इत्यादी कार्यकर्त्यांनी आमदार समीर कुणावर भाजपा जिल्हा महामंत्री किशोर भाऊ दिघे,भाजपा जिल्हा सचिव सुभाषजी कुंटेवार, सरचिटणीस विनोद भाऊ विटाळे,रविभाऊ रोहणकर, यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला
यावेळी देवराव सपाट,दिनेश लढी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
