कुठे जायचे’ तुम्‍हीच ठरवा!घर’ दवाखाना की स्मशान? स्वतः सुरक्षित राहून कुटुंबालाही सुरक्षित ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, समुद्रपूर


समुद्रपूर कोरोना विषाणुने देशभरात थैमान घातले असून,संपूर्ण जनजीवन विस्कळीत करून जनतेला त्रस्त करून सोडले आहे. कोरोणाची दहशत पुन्हा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.त्यामुळे ब्रेक द चेनच्या अंतर्गत सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. कोरोणाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बघ ठरूवून दिले आहे.
दिलेल्या वेळेपर्यंत म्हणजेच १ मेपर्यंत सर्वांनी आपआपल्या घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी घरीच थांबण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.नाहीतर उद्या लोक म्हणतील,माणूस चांगला होता पण कोणाला ऐकत नव्हता.असे म्हणण्याची वेळ आपल्यावर कोणी येऊ देऊ नये,त्यामुळे आपणच ठरवा काय योग्य आहे?घरात राहूनच कुटुंबासोबत वेळ घालवायचा? की रुग्णालयात सलाईन घेत बेडवर पडायचे.
कोरोणाच्या वाढत्या पादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खबरदारी तुमची जबाबदारी माझी,तर कोरोणाचा अर्थच कोई रोड पे ना निकले असे जोडले जात आहे. बाहेर विनाकारण फिरताना फुकट पोलिसांकडून प्रसाद घेण्यापेक्षा किंवा दंड भरण्यापेक्षा घरातच आपल्या कुटुंबासोबत घालवा,असा संदेश संपर्काची सर्वात मोठी माध्यम असणाऱ्या सोशल मीडियावर अनेक जण संदेश देत आहे.वेळ गंमतीची नाही तर एका भयंकर भयंकर आजाराशी जडण्याचा आहे. इतर देशातील जनताही आपल्या देशात कोरोना व्हायरसमुळे रोज असंख्य लोक मरत असल्याचे पाहून हतबल झाले आहे.एका प्रगतशील देशाची पंतप्रधानाचे दुःख,हतबलता रडणे बघून आपण प्रत्येकाने एक 11 धडाच घेतलं पाहिजे,ही वेळ आपल्यावर किंबहुना आपल्या देशावर न येण्यासाठी एक जागरूक नागरिक प्रमाणे घरात बसून प्रशासनास सहकार्य करणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.
काही अपवादात्मक कर्मचारी सोडले.शासकीय कर्मचारी सध्याच्या वेळी नेहमीच्या वेळेपेक्षा पेक्षा जास्त काम करीत आहे.त्यामुळे आपणही देशावर निर्माण झालेल्या संकटाच्या वेळी प्रशासनात सहकार्य करणे गरजेचे आहे.आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी,महसूल व पोलिस प्रशासन, शिक्षक तसेच सफाई कामगार हे अविरतपणे कोरोना सारख्या भयावह परिस्थितीत सेवा देऊन आपले कर्तव्य बजावत आहेत.चांगल्या वातावरणात काम करण्याची वेगळे आणि आपत्कालीन काळात काम करणे धोक्याचे असते.यासाठी कोणी कौतुक करावे ही अपेक्षा सुद्धा त्यांना नाही, परंतु निदान नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन तरी केले पाहिजे.
प्रशासनाच्या मते युद्धाच्या आधी सैन्याच्या थकायचं नसतं मात्र आज आरोग्य विभागाचे सर्वत्र
कर्मचारी पोलीस प्रशासन महसूल. विभाग शिक्षक वर्ग यांना रुग्णांची सेवा व कोरोणाच्या सुरक्षेची तयारी सोडून,लोकांची दुकाने बंद करणे, लोकांना घरात राहायला सांगणे, विलीनीकरण केलेल्या व पळून गेल्याने शोधून काढणे,बाहेर गावातून शहरातून आलेल्या लोकांच्या अद्यावत माहिती गोळा करणे,गर्दीला पांगवणे, अशी जी कामे आपण स्वतः केली पाहिजे,शिस्त पाळली पाहिजे मात्र त्यासाठी प्रशासनाला गुंतवून आपण त्यांना खरे कामच करू देत नसल्याची नामुष्की दुर्देवाने पत्करावी लागत आहे.
आपल्याला संचारबंदी दरम्यान सर्वत्र केवळ दुकाने बंद असताना कसे दृश्य दिसते हे बघायला,बंद मार्केट, कॉलेजचा रस्ता कसा दिसतो,ते बघायला जात आहेत.उद्या जर या आजाराने जर अधिक उग्र रूप धारण केले तर आवरणे अशक्य होईल त्यावेळी आपली यंत्रणा सुद्धा काही करू शकणार नाही.म्हणून आज घरात बसून देशहिताचे असेल तर हे करायला हवे गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य केले तर उद्याचं भविष्य असेल अन्यथा आपणच ठरवा आपल्याला घराबाहेर निघून दवाखान्यात राहायचं की कायमचे फोटोमध्ये स्मरण म्हणून राहायचे?हा निर्णय आता आपल्याला घ्यायचा आहे,त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणे आज रोजी काळजी काळाची गरज बनली आहे.आणि हे सर्व केवळ आपल्याला योगदानामुळे शक्य होईल.