
राळेगाव तालुका प्रतीनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
हिंगणघाट तालुक्यातील गांगापुर येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले असून 20-25 दिवसाचा कालावधी लोटूनही अद्याप नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले नाही. त्यामुळे गांगापूर येथील नळ 20-25 दिवसापासून बंद आहे व पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत विद्युत वितरण कंपनीला वारंवार सूचना देवूनही कुठलीच कार्यवाही झाली नाही.विद्युत वितरणाच्या निष्काळजी पणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याची दखल घेत राज्य उपाध्यक्ष अतुलभाऊ वांदीले यांच्या मार्गदर्शनात तालुका संघटक जयंतभाऊ कातरकार यांनी विद्युत वितरण कंपनीला निवेदन देवून दोन दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून द्यावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी तालुका संघटक जयंतभाऊ कातरकर, निलेशभाऊ नक्षीने, धनंजयराव चांभारे, परमेश्वरराव नैताम, गोपेंद्राजी नैताम व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
